Ad will apear here
Next
प्राण्यांसाठी केले पाणवठे स्वच्छ
तहान भागवताना प्राणीठाणे : वन विभागाने येऊर जंगलातील नैसर्गिक झरे आणि पाणवठे स्वच्छ केल्यामुळे कडाक्याच्या उन्हातही प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. इतक्या भीषण उन्हातही येथील प्राण्यांना उष्णतेच्या झळा जाणवल्याच्या घटनेची कोणतीही नोंद नसल्याची माहिती वन विभागाने दिली. 

पाणवठे स्वच्छ करताना कर्मचारीगेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने, धरण क्षेत्रासह तलावांमध्ये समाधानकारक पाणी होते; मात्र मागील उन्हाळ्यात येऊरमधील पाणीसाठे आटत असल्याने वन विभागाने जंगलातील नैसर्गिक पाणीसाठे स्वच्छ करून घेतले होते. त्यांचा फायदा पावसाळ्यात होऊन जंगल परिसरातील बहुतांश पाणवठे तुडुंब भरून वाहू लागले होते; मात्र पावसाळा सरल्यानंतरही नैसर्गिक पाणवठे आणि तेथील झरे वन विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन स्वच्छ केल्याने पाणी खोलवर झिरपले. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत झालीच. शिवाय पाणवठ्यांनी सध्या तळ गाठूनही या भागात बिबटे, चितळ, सांबर, भेकर, माकड, रानडुक्कर, मोर, उदमांजर अशा प्राण्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध होत आहे.

वन विभागाचे कर्मचारी जंगलाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागातील पाणवठे आत्ताही स्वच्छ करत असून, येथील कचरा वेळोवेळी साफ केल्याने प्राण्यांना स्वच्छ पाणी पिता येते. तसेच त्यामुळे झरे खुले राहण्यासही मदत होत असल्याची माहिती येऊरमधील वन विभाग अधिकारी, वाघमोडे यांनी दिली आहे. 

(बातमीतील छायाचित्रे मितेश पांचाळ यांनी काढली आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DYYQBB
Similar Posts
पारसिक बोगदा कारवाईस न्यायालयाची स्थगिती ठाणे : पारसिक बोगद्यावरील बांधकामावर प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांचे सद्यस्थितीत रेंटल हाउसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून, तीन महिन्यात त्यांचे ‘बीएसयूपी’मध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन
‘वृक्षारोपण मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा’ ठाणे : ‘यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या दोन, चार आणि १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेतील किती झाडे जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारी २०१९ पर्यंत सर्व विभागांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी; तसेच २०१९मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने जनतेचा सहभाग कसा वाढवता येईल याचे
प्राणिप्रेमी करणार वन्यजीवगणना ठाणे : प्राणिप्रेमींतर्फे वन्यजीवगणनेचा कार्यक्रम आज, १० मे रोजी ठाण्यात राबवला जाणार आहे. ठाण्यातील येऊर, तुंगारेश्वर अभयारण्य, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या अभयारण्यांमध्ये त्यासाठी जवळपास ५० मचाणे उभारण्यात आली आहेत. सोडत पद्धतीने या उपक्रमातील निरीक्षकांची निवड करण्यात येते. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून
ठाण्यातील अभयारण्यांत सात बिबटे ठाणे : येऊर, तुंगारेश्वर, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या ठाण्यातील चार अभयारण्यांमध्ये सात बिबटे आणि ३९२ चितळे असल्याचे आढळून आले आहे. १० मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिप्रेमींतर्फे राबवण्यात आलेल्या वन्यजीवगणनेवेळी आढळलेल्या प्राण्यांची आकडेवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी जाहीर केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language